उद्धव ठाकरेंनी वैष्णवीच्या वडीलांना फोनवरून दिला धीर म्हणाले ” काळजी करू नका आम्ही…”

Uddhav Thackeray calls Kaspate family : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट असून या प्रकरणातील फरार आरोपी तिचे सासरे आणि दीराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना न्यायालयाने २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवीच्या आई आणि वडिलांना आम्हाच्या लेकीला न्याय मिळावा अशी आर्त हाक दिली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आहे. अशातच वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधत तुमच्या सोबत असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना उबाठा पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी वैष्णवी यांच्या आई-वडिलांची वाकड येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. यावेळी वैष्णवीबाबत झालेली घटना दुर्दैवी आहे. शिवसेना परिवार तुमच्यासोबत आहे. सरकारकडे पाठपुरावा करू, काळजी करू नका, वैष्णवीला न्याय मिळवून देऊ, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधून कस्पटे कुटुंबीयांना धीर दिला. या प्रकरणी विधानसभेत आवाज उठविला जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
नराधकांना फाशी द्या
वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणावर भाजप महिला मोर्चेाच्या पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले. या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा सुशील हगवणे यांना शिवाजीनगर कोर्टात आणल्यानंतर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी नराधमांना फाशी द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच पोलिसांच्या वाहनावर आंदोलकांनी टोमॅटो फेकले.





