Uddhav Thackeray : “मोदी महाशय गद्दारांना सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे”; उद्धव ठाकरेंकडून जोरदार शाब्दिक हल्ला
Uddhav Thackeray : "मोदी महाशय गद्दारांना सांगताहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. त्यांचे नवे स्वामी मोदी झाले असल्याची खरमरीत टीका केली.

Uddhav Thackeray : मातोश्रीवर उबाठा गटाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
नुकतीच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटातून फुटून शिंदेसेनेत दाखल झालेल्या खासदारांसोबत दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीवरुन उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. “मोदी महाशय गद्दारांना सांगताहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. त्यांचे नवे स्वामी मोदी झाले.” अशी खरमरीत टीका केली.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“मोदींनी गद्दारांना सांगितलं. स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठिशी. तसं मोदी नवे स्वामी झाले का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तरुणाई त्यांची निंदा नालस्ती करते. पण मोदी महाशय गद्दारांना सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे. गद्दारांना चिंता कशाची आहे. वॉशिंग मशीनमध्ये गेले. पण गद्दारीचा डाग काही जात नाही.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फुटीर खासदारांवर निशाणा साधला.
भिऊ नका मी तुमच्या पाठिशी आहे हे सांगायला पाहिजे
जंतर मंतर येथील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरुन व्हिडिओ शेअर करत तरुणांशी संवाद साधला. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देत मोदींवर जोरदार हल्ला चढवला. “देशातील तरुण न्याय हक्कासाठी आंदोलन करताना तुम्ही त्यांना भेटत नाही. बेशरमपणे गद्दारांना नुसते भेटत नाही. तर मी तुमच्या पाठिशी आहे असं बेशरमपणे सांगतात. त्यांनी तरुणांना भाऊ, आजोबा फ्रेंड्स म्हणून भिऊ नका मी तुमच्या पाठिशी आहे हे सांगायला पाहिजे होतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
न्यायालयाबद्दल विश्वास आणि खात्री
सध्या शिवसेना नेमकी कुणाची यावर सर्वेाच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, उबाठा गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. या सुनावणीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले “गेल्या चार वर्षापासून केसची सुनावणी सुरू झाली आहे. मी आजपर्यंत कधीही आणि या पुढेही हे प्रकरण न्यायालयात असल्याने बोललो नाही. बोलणार नाही. संविधानाप्रमाणे निकाल द्यावा. लागेल याची खात्री आहे. न्यायालयाबद्दल विश्वास आणि खात्री आहे.”
मोठं विधान
पुढं बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले “आता देशात मतलबी वारे सुरू आहे. विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे लोक जातात. त्यांना वाटतं विरोधक थंड होतील. पण तसं होणार नाही. देशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे.” असं मोठ विधान केलं.






