“उद्धव ठाकरे बिनडोक, तर आदित्य ठाकरे बालिश”; भाजप नेत्याची जहरी टीका

Uddhav Thackeray and Aditya Thackeray | बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून 23 जानेवारी रोजी मुंबईत अंधेरीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
‘मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह काय आहे, किस झाड की पत्ती है?,’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर टीका केली. या टिकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा बिनडोक तर आदित्य ठाकरेंना बालिश म्हणून उल्लेख केला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जनमाणसात प्रतिमा मलीन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही उद्धव ठाकरे यांच्यात सुधारणा होत नाहीत. 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही. त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमित भाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर नेहमी टीका करतात. उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलोत.”
गद्दारीचं गालबोट उद्धव ठाकरेंनी लावलं
“जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती. 2019 मध्ये त्यांच्याकडून गद्दारी झाली ते भारतीय जनता पार्टी सोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लावलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची… त्यांनी जर तेव्हाच भाजपाशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राच वेगळं चित्र असतं,” असेही बावनकुळे म्हणाले. Uddhav Thackeray and Aditya Thackeray |
पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे. आता महाराष्ट्रातील जनतेला विकासाकडे नेण्याऱ्यांचं राज्य हवं आहे. उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतन बाहेर निघावं, बिनडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या म्हणजे काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल,” असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. Uddhav Thackeray and Aditya Thackeray |
“आदित्य ठाकरे दावोसबाबत जे काही बोलले त्यातून त्यांचा बालीशपणा दिसून येतो. त्यांना अजून सरकार पूर्ण कळले नाही. ते दोन वर्षे पर्यटन मंत्री होते. मात्र पर्यटनच करीत राहिले. त्यांना कामकाज कसे करावे लागते, प्रशासन कसे चालवावे लागते हे कळले नाही. 17.75 लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत आणल्यामुळे त्यांनी देवेंद्रजींचे अभिनंदन केले पाहिजे होते. पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कारटे आहेत काही सुधारत नाही,” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
हेही वाचा:





