अमित शाहांसोबत काय चर्चा झाली का? छगन भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिकमधील मालेगाव येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी अजंग येथे उभारलेल्या व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी भेट दिली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात छगन भुजबळ आणि अमित शाह हे दोन्ही नेते व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा रंगल्याचे दिसून आले दोन्ही नेत्यांमध्ये नक्की चर्चा झाली यावर याबाबत स्वतः छगन भुजबळ यांनी माहिती दिली.
‘जय जवान, जय किसान एवढीच चर्चा झाली. दुसरी काही चर्चा झाली नाही, एवढीच आमच्यात चर्चा झाली. दुसरी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
कार्यक्रमावेळी छगन भुजबळांना पाहताच अमित शाह यांनी त्यांना त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसायला सांगितले. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अमित शाह साहेबांचा मोठेपणा आहे की त्यांनी मी लांब बसलेलं असताना मला आपल्या जवळ बोलावून खुर्चीवर बसवले.
‘तीन वर्षांपूर्वी येथील काही लोक माझ्याकडे आले. तेव्हा मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं. पण ही एक खरोखर किमया येथील शेतकऱ्यांनी करून दाखवली. एवढीच चर्चा आमच्यात झाली. इतर कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही’, असे भुजबळ म्हणाले.
तसेच, मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह यांच्याशी त्यांची चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर तुम्ही भविष्यात दिल्लीला जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ‘दिल्ली या देशाची राजधानी आहे. तुम्ही आणि आम्ही आपण कधीही जाऊ शकतो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी या प्रश्नावर दिली.





