Uddhav Thackeray Dasara Melava : “गद्दारांच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा…’; उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल

Updated On:

Uddhav Thackeray – शिवसेना (shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दसरा मेळाव्यात (Dasara Melava ) काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली. शिवसेनेत (shivsena) गेल्या वर्षी भली मोठी फूट पडली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण बदलायचं आपण पाहिलं आहे.

तर दुसरीकडे 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. आता उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय काय मुद्दे मांडणार? आमदार अपात्रतेचा मुद्दा, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, रस्त्यावरची लढाई या सगळ्यांबाबत काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

शिवतीर्थ परिसरात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय. त्यासोबत मशाल चिन्ह असलेली पुर्ण भगवी पताका संपूर्ण शिवजी पार्क परिसरात लावण्यात आली आहे, शिवसेना भवन ते शिवाजी पार्क परिसरातील भगव्यामय वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात झाली असून, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) मोठ्या प्रमाणात नागरिक उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी जमले असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केलीय.

– 57 वर्ष झाले पण आपण आपली परंपरा चालूच ठेवली आहे. काही लोकांनी ही परंपरा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आपण मोडू दिला नाही. आपला मेळावा झाल्यानंतर इथे आपण खोकासुराचं दहन करणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

– उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मनोज जरांगे पाटलांचे धन्यवाद मानले. ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. त्यांनी आता धनगर समाजालाही आव्हान केले आहे. शांततेत होणाऱ्या आंदोलनावर लाढीचार्ज झाला. मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. लोकांवर लाढीचार्ज झाला हे दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

– सध्या क्रिकेटचा मौसम सुरु आहे. तिकडे 3 हिरो जाहिराती करत आहेत. हे कमला पसंद वाले अशी जाहिरात करतात. तर आमच्याकडे कमळा पसंद वाले आहेत. पसंद अपनी अपनी अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवर निशाणा साधला.

आणखी संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : चालकांना मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ द्यावा; 'या' नेत्याची मंत्री प्रताप सरनाईकांना विनंती

2026-08-23 22:19:20

Pratap Sarnaik : चालकांना मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ द्यावा; 'या' नेत्याची मंत्री प्रताप सरनाईकांना विनंती

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

2026-08-23 18:31:57

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

2026-08-22 22:59:41

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

LPG Pipeline Project : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 1800 किमी LPG पाईपलाईन, 7000 कोटींची मंजुरी

2026-08-22 19:26:59

LPG Pipeline Project : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 1800 किमी LPG पाईपलाईन, 7000 कोटींची मंजुरी

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

2026-08-22 18:47:41

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश