Satara | उदयनराजेंनी मनोज घोरपडे यांना दिली ‘जादू की झप्पी’

सातारा, (प्रतिनिधी) – भाजपचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेते मनोज घोरपडे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे शनिवारी अनौपचारिक भेट घेतली. निवडणुकीत घोरपडे यांच्या उमेदवारीला उदयनराजे यांनी शुभेच्छा देऊन, त्यांना आलिंगन दिले. या दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सुमारे तासभर चर्चा झाली,
सातारा जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांमधील उमेदवार महायुतीने अजून निश्चित केलेले नाहीत, कराड उत्तरमधून धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे हे प्रबळ दावेदार आहेत. मनोज घोरपडे यांनी ‘मनोज पर्व’ या कार्यक्रमाद्वारे मतदारसंघात आपली ताकद दाखवून दिली आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून मनोज घोरपडे यांचे दौरे वाढले आहेत. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे शनिवारी भेट घेतली. उदयनराजेंनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत सुमारे तासभर चर्चा झाली
जिल्ह्यात भाजपचे प्रचार मेळावे सुरू झाले आहेत. सातारा येथील मेळाव्यात खासदार उदयनराजे यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी घोरपडे यांना शुभेच्छा दिल्या.
या भेटीसंदर्भात मनोज घोरपडे म्हणाले, भाजपचे नेते आणि खासदार या नात्याने उदयनराजे यांचा आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राबता असणार आहे. त्या दृष्टीने उदयनराजे यांची खास भेट घेतली.





