Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ॲक्शन मोड’मध्ये! तातडीने बोलावली पत्रकार परिषद
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अत्यंत वेगवान आणि मोठ्या घडामोडी घडताना (Uddhav Thackeray) दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले असून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे.

Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अत्यंत वेगवान आणि मोठ्या घडामोडी घडताना (Uddhav Thackeray) दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले असून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी थेट बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत मोठा आणि धक्कादायक निर्णय मानला जात आहे.
या मोठ्या फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्या सहा खासदारांनी बंडखोरी केली, त्यांच्या सर्वच मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांनी तातडीने जाहीर सभा घेत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या सभांच्या माध्यमातून त्यांनी बंडखोर खासदारांवर आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल केला आहे.
पक्षातील या पडझडीच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत ठाकरे एक मोठी घोषणा करणार असून, राम मंदिरातील कथित दान घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाची अधिकृत घोषणा उद्याच्या पत्रकार परिषदेत केली जाईल.
एल्गार!
शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
शुक्रवार
३ जुलै
१२.३० वाजता
मातोश्री!! pic.twitter.com/FxQkO0OjJX— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2026
या आंदोलनाचा भाग म्हणून ठाकरे गटाकडून राज्यभरातील (Uddhav Thackeray) प्रमुख राम मंदिरे आणि हनुमान मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. आंदोलनाची सुरुवात दादर पश्चिम येथील हनुमान मंदिरातील ‘रामरक्षा महाआरती’ने होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आगामी काळात सरकारला कोंडीत पकडण्याचा ठाकरे गटाचा मानस आहे. याबाबतची अधिकृत माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत दिली आहे.
एकीकडे सहा खासदारांनी पक्ष सोडलेला असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी देखील वेगळी चूल मांडल्याने, वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोरील राजकीय अडचणी आणि आव्हाने मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व अंतर्गत आव्हानांना आणि राजकीय संकटांना उद्धव ठाकरे उद्याच्या पत्रकार परिषदेत कसे उत्तर देतात आणि पक्षाला नवीन दिशा कशी देतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





