Uddhav Thackeray : मुंबई महापालिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. या निवडणुकीसह राज्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदा आणि महापालिकांसाठी पक्षाकडून रणनिती आखली जात आहे. यंदाची निवडणूक या आधीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम सुरू आहे. आता मुंबई महापालिकासाठी उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. तर ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटात प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेही वाचा : Pune District : बावडा-लुमेवाडी गटात चुरस रंगणार; लक्षवेधी लढतीत प्रतिष्ठित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला या संभाव्य निर्णयामुळे ज्येष्ठ नगरसेवक नाराज झाल्यास ते वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे याचे मुंबईच्या राजकीय पटलावर काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशी चर्चा असली तरी पक्षाकडून नवे व जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखला जाणार आहे. ठाकरेंच्या सेनेचे किमान 70 टक्के नवे चेहरे मुंबई महापालिकेसाठी उमेदवार असतील. अद्यापर्यंत दोन्ही भाऊ राज-उद्धव यांची राजकीय युतीची अधिकृती घोषणा झालेली नाही. पण अंतर्गत गोठात रणनितीची आखणी केली जात आहे. त्यानुसार मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे. महत्वाचे मुद्दे सर्वात महत्वाचे म्हणजे उमेदवार देताना प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभाव यांचा विचार केला जाणार आहे. मुंबई महापालिकेवर २०१७ मध्ये शिवसेनेचे ८४ उमेदवार विजयी झाले होते. पण यातील अनेक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. याच कारणामुळे घटलेली नगरसेवकांची संख्या लक्षात घेता नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार आहेत. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना संधी दिली जाणार नाही, अशी एक चर्चा आहे. मात्र, त्यांच्या वॉर्डातील उमेदवार निश्चित करताना त्यांचे अनुभव, पक्षातील योगदान याचा विचार पक्षाकडून केला जाणार आहे. याचा उपयोग नव्या चेहऱ्यांना होऊ शकतो. हेही वाचा : Pune District : इंदापूरमध्ये सुरु होणार प्रगत मत्स्य महाविद्यालय – भरणे