Ajay Singh : अजय सिंह यांनी मानले सोनिया गांधींचे आभार
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आपल्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात दिवंगत नेते अर्जुन सिंह यांच्या राजकीय मुसद्देगिरीची आणि शहाणपणाची दखल घेतल्याबद्दल, त्यांचे वरिष्ठ काँग्रेस नेते अजय सिंह (Ajay Singh) यांनी गुरुवारी आभार मानले आहेत.

Ajay Singh : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आपल्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात दिवंगत नेते अर्जुन सिंह यांच्या राजकीय मुसद्देगिरीची आणि शहाणपणाची दखल घेतल्याबद्दल, त्यांचे वरिष्ठ काँग्रेस नेते अजय सिंह (Ajay Singh) यांनी गुरुवारी आभार मानले आहेत.
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकात सोनिया गांधी यांनी दाऊ साहेब म्हणून लोकप्रिय असलेले अर्जुन सिंह हे काँग्रेसमधील सर्वात अनुभवी आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत हुशार नेत्यांपैकी एक असल्याचे लिहिले आहे, अशी माहिती अजय सिंह (Ajay Singh) यांनी एका निवेदनात दिली.
सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे की, अतिशय बिकट आणि कठीण प्रसंगातही अर्जुन सिंह सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत आणि संपूर्ण समस्येचा गाभा एका छोट्या वाक्यात मांडत असत. तसेच, दाऊ साहेबानी दिलेला इशारा जेव्हा जेव्हा दुर्लक्षित करण्यात आला, तेव्हा तेव्हा पक्षाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले, असेही त्यांनी पुस्तकात लिहिल्याचे अजय सिंह यांनी सांगितले.
याविषयी भावना व्यक्त करताना अजय सिंग म्हणाले, आज दाऊ साहेब आपल्यात नाहीत, परंतु पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने त्यांच्या अनुभवाचा, दूरदृष्टीचा आणिनिष्ठेचा इतक्या आदरपूर्वक सत्कार करणे, ही आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
आपले वडील अर्जुन सिंह यांनी नेहमी तत्त्वनिष्ठ राजकारण केले असून, त्यांची राजकीय समज आणि संवेदनशीलता देश आजही मान्य करतो, असे सांगत सिंह (Ajay Singh) पुढे म्हणाले की, दाऊ साहेबांसाठी पदापेक्षा पक्ष आणि देशाचे हित नेहमीच अधिक महत्त्वाचे राहिले आहे.






