UAE vs PAK : पाकिस्तानचा यूटर्न; आशिया कप 2025 मधील UAE सामन्यावरील बहिष्कार मागे

पाकिस्तानी माध्यमांनुसार, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान झालेल्या ‘हस्तांदोलन वादा’नंतर पीसीबीने हा निर्णय घेतला. या वादात मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याशी संबंधित मुद्दा उपस्थित झाला होता, ज्यामुळे पीसीबीने त्यांना मॅच रेफरी पदावरून हटवण्याची मागणी केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ही मागणी फेटाळली.
आयसीसीने पीसीबीची विनंती फेटाळली –
पीसीबीने अँडी पायक्रॉफ्ट यांना मॅच रेफरी पदावरून हटवण्यासाठी आयसीसीला ईमेल पाठवला होता. परंतु, आयसीसीने ही विनंती नाकारली. आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, अँडी पायक्रॉफ्ट बुधवारच्या सामन्यात मॅच रेफरी म्हणून कायम राहतील. जर पाकिस्तान संघ खेळण्यासाठी मैदानावर उतरला नाही, तर यूएईला पूर्ण गुण दिले जातील. त्यामुळे पाकिस्तानचेच नुकसान होणार होते. त्यामुळे आता पाकिस्तानने हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे,
हेही वाचा – Fake Football Team : अजब पाकिस्तानी गजब कारनामे, जपानला जाण्यासाठी बनवली खोटी फुटबॉल टीम, विमानतळावर अटक!
पीसीबीची मागणी पुन्हा फेटाळली –
पीसीबीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर आरोप करत त्यांना आशिया कपमधून हटवण्याची मागणी आयससीकडे केली होती. तसेच यूएईविरुद्धच्या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. मंगळवारी, 16 सप्टेंबर रोजी दुबईत पीसीबीची तातडीची बैठक झाली, ज्यात अमिरात क्रिकेट बोर्डाने मध्यस्थीचा प्रयत्न केला. असे वृत्त होते की, पायक्रॉफ्ट यांना पाकिस्तानच्या सामन्यांतून हटवून रिची रिचर्डसन यांची रेफरी म्हणून नियुक्ती होईल. मात्र, बुधवारी पीसीबीने पुन्हा आयसीसीला ईमेल पाठवून मागणी केली, परंतु आयसीसीने दुसऱ्यांदा ही मागणी फेटाळली.
हेही वाचा – Varun Chakravarthy : वरूण चक्रवर्तीची कमाल! ICC च्या ‘या’ क्रमवारीत पटकावलं नंबर वन स्थान
भारतीय संघ सुपर-4 मध्ये दाखल –
भारतीय क्रिकेट संघाने सोमवार, 15 सप्टेंबर रोजी ग्रुप ‘ए’ मधून सुपर-4 साठी पात्रता मिळवली आहे. आशिया कप 2025 चा सुपर-4 फेरी शनिवार, 20 सप्टेंबरपासून सुरू होईल. ही फेरी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल, ज्यामध्ये ग्रुप ‘ए’ आणि ‘बी’ मधील पहिले दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. यानंतर सुपर-4 मधील पहिल्या दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.





