U19 T20 Asia Cup 2024 (Women’s) : ‘भारत-बांगलादेश’ विजेतेपदासाठी भिडणार, जाणून घ्या; कधी-कुठे-केव्हा अन् Free मध्ये कसा पाहू शकता Final सामना..

U19 Women’s T20 Asia Cup 2024 (IND vs BAN Final) : महिला अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. हा सामना रविवारी (22 डिसेंबर 2024) मलेशियातील क्वालालंपूर येथे होणार आहे. टीम इंडियाने सुपर फोरमध्ये श्रीलंकेचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली होती. तर बांगलादेशने नेपाळचा पराभव केला होता. चाहत्यांना हा सामना मोफत(Free) पाहता येणार आहे. यासोबतच स्कोअर अपडेट्सही मिळतील.
भारत आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारी सुपर फोरचा शेवटचा सामना झाला. टीम इंडियाने श्रीलंकेवर 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात आयुषी शुक्लाने शानदार गोलंदाजी करत 4 बळी घेतले. तर बांगलादेशने नेपाळचा 9 विकेट्सने पराभव केला. मात्र अंतिम फेरीचे आव्हान त्याच्यासाठी सोप्पे नसेल. कारण, टीम इंडियाने बांगलादेशवर या स्पर्धेतील सुरूवातीच्या एका सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता.
टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर कायम …
स्पर्धेत सुपर 4 च्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. भारताने 4 सामने खेळले आणि 3 जिंकले. तर एक सामना अनिर्णित राहिला. भारताचे एकूण 7 गुण आहेत. बांगलादेश संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यांनी 4 सामने खेळले आणि 3 जिंकले. यासह एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याचे 6 गुण आहेत. नेपाळचा संघ तिसरा आणि श्रीलंकेचा संघ चौथ्या स्थानावर राहिला.
The Super 4’s have concluded, and India tops the points table with 7 points, followed closely by Bangladesh with 6 points—both securing their spots in the finals. Nepal and Sri Lanka bow out after a hard-fought campaign. #ACCWomensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/kpAiKWPYWE
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 20, 2024
लाइव्ह सामना कधी आणि कुठे विनामूल्य पाहू शकाल..
भारत आणि बांगलादेश यांच्यातील अंडर-19 महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (22 डिसेंबर 2024) होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल. चाहत्यांना हा सामना विनामूल्य पाहता येणार आहे. यासाठी तुम्हाला एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (Asian Cricket Council) यूट्यूब चॅनलवर जावे लागेल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण येथे होणार आहे. सुपर फोरच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपणही येथे मोफत करण्यात आले होते.





