Australia 15 player squad for the final two test (IND vs AUS) : ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दोन कसोटींसाठी संघात मोठे बदल केले आहेत. त्यांनी अशा दोन खेळाडूंना संधी दिली आहे, त्यापैकी एक फलंदाजीत सलामीची जबाबदारी सांभाळेल आणि दुसरा गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुढील दोन कसोटी सामने मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवले जाणार आहेत. बॉक्सिंग डे टेस्ट 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये होणार आहे. तर नवीन वर्षाचा म्हणजेच अखेरचा कसोटी सामना सिडनीत खेळवला जाणार आहे. दोन्ही देशांमधील 5 कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना भारताने जिंकला. तर ॲडलेडमध्ये डे-नाईट खेळली गेलेली दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली. दोन्ही संघांमध्ये ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी अनिर्णित ठरली.
JUST IN: Australia have added young gun Sam Konstas to a 15-player squad for the final two #AUSvIND Tests | @ARamseyCricket https://t.co/9P0hGCCqXw
— cricket.com.au (@cricketcomau) December 20, 2024
हेजलवूड बाहेर….
कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमधून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान हेजलवूडला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियन संघात हेझलवूडच्या जागी झाय रिचर्डसनचा समावेश करण्यात आला आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनला आतापर्यंत केवळ 3 कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. श्रीलंका आणि इंग्लंड यांसारख्या संघांविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या 3 कसोटींमध्ये रिचर्डसनच्या नावावर एकूण 11 विकेट्स आहेत.
नॅथन मॅकस्विनीला डच्चू….
वेगवान गोलंदाजीतील या बदलाशिवाय संघात आणखी एक बदल सलामीच्या जोडीमध्ये पाहायला मिळत आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी बदललेली दिसेल. नॅथन मॅकस्विनी एमसीजीमध्ये उस्मान ख्वाजासोबत डावाची सुरुवात करताना दिसणार नाही. ऑस्ट्रेलियन संघाच्या निवडकर्त्यांनी शेवटच्या दोन कसोटींसाठी मॅकस्विनीच्या जागी सॅम कॉन्स्टासला आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे सॅम कॉन्स्टासला ही संधी मिळाली आहे.
Melbourne Test : आघाडीच्या फळीचा फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय – इयान हिली
शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी(यष्टीरक्षक), सॅम कॉन्स्टास, झाय रिचर्डसन, जोश इंग्लिश, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.