IND vs PAK Final : भारत-पाक फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा; खेळाडूंमध्ये भरमैदानात वादावादी, पाहा VIDEO

IND vs PAK Final clashes video viral : दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पारंपरिक कट्टरता पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या हाय-व्होल्टेज सामन्यात केवळ बॅट आणि बॉलचा थरारच नाही, तर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध आणि ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा देखील अनुभवायला मिळाला.
धावांचा डोंगर आणि वादांचा थरार –
या विजेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ गडी गमावून ३४७ धावांचा विशाल डोंगर उभा केला. भारतासमोर विजयासाठी ३४८ धावांचे कठीण लक्ष्य होते. मात्र, या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय डावाच्या तिसऱ्या षटकापासूनच मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
What is Ayush Mhatre saying 🫣#INDvsPAK pic.twitter.com/OZYtKOkWym
— Himanshu Singh Rajput (@theDakshRajput_) December 21, 2025
कर्णधार आयुष म्हात्रे आणि अली रझा यांच्यात वादावादी –
🚨 Heated moment between Ayush Mhatre & Pakistani players 🚨pic.twitter.com/NUsXI6dJs6
— VIKAS (@Vikas662005) December 21, 2025
भारतीय डावाच्या तिसऱ्या षटकात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अली रझाने भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेला स्वस्तात बाद केले. आयुषने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मिड-ऑफवर फरहान युसूफच्या हातात विसावला. आयुष केवळ २ धावा करून बाद झाला. विकेट मिळाल्यानंतर अली रझाने अत्यंत आक्रमक पद्धतीने जल्लोष केला आणि आयुषच्या दिशेने वळून काहीतरी आक्षेपार्ह टिप्पणी केली. या ‘सेंड-ऑफ’मुळे आयुष संतापला आणि दोघांमध्ये भरमैदानात तीखी नोकझोंक सुरू झाली. अखेर पंचांना मध्यस्थी करून हा वाद सोडवावा लागला.
हेही वाचा – AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा ॲशेस मालिकेवर कब्जा; मालिका जिंकली असली तरी चौथ्या कसोटीपूर्वी बसला मोठा धक्का!
वैभव सूर्यवंशीची आक्रमक खेळी आणि वाद –
Lafda between Vaibhav Suryawanshi and Ali Raza, Suryavanshi showing ali raza and porkies their right place.🤣🔥 #INDvsPAK pic.twitter.com/pspUjd50jD
— U’ (@toxify_vkf) December 21, 2025
दुसरीकडे, सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अवघ्या १० चेंडूत २६ धावा करत भारताला वेगवान सुरुवात करून दिली होती. मात्र, आयुषपाठोपाठ वैभवही अली रझाचाच शिकार ठरला. वैभव बाद झाल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडूंनी पुन्हा एकदा आक्रमक जल्लोष केला. हे पाहून वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला आणि तो देखील पाकिस्तानी खेळाडूंशी भिडला. काही काळ मैदानावर तणावाचे वातावरण होते, पण अखेर वैभव पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारत-पाकिस्तान सामन्यातील ही जुनी ‘रायव्हलरी’ या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यामुळे भारतीय संघ या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दबावाखाली आला. यानंतर भारताचा डाव पूर्णपणे डळमळीत झाला असून ९४ धावांपर्यंत सात विकेट्स पडल्या आहेत.





