U14 Champs Trophy : एके स्पोर्टस अकादमी उपांत्य फेरीत

Champs Trophy Under 14 Cricket Tournament – चॅम्प्स स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एके स्पोर्टस क्रिकेट अकादमी संघाने चौथ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. धायरी येथील स्टार स्पोर्टस क्रिकेट अकादमी व सहारा क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अथर्व आखाडे नाबाद 106)याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर एके स्पोर्टस क्रिकेट अकादमी संघाने एजीएस क्रिकेट अकादमी चा 47 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना एके स्पोर्टस क्रिकेट अकादमी संघाने 25षटकात 4बाद 175धावा केल्या. यात अथर्व आखाडेने 76चेंडूत 17चौकार व 2षटकाराच्या मदतीने नाबाद 106 धावांची शतकी खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्याला राजवीर देशमुखने 18 धावा काढून साथ दिली. याच्या उत्तरात एजीएस क्रिकेट अकादमी संघाचा डाव 21.4षटकात सर्वबाद 128धावावर संपुष्टात आला. यात शौर्य कोंडे 33, रणवीर पांगरे 25, श्रावण वाव्हळ 19 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. एके स्पोर्टस संघाकडून तन्मय मैती(3-5), प्रणय आवळे(2-10) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-gtvmi-match-5-pollard-backs-captain-hardik-pandyas-that-decision/
दुसऱ्या सामन्यात अथर्व शिंदे(नाबाद 35धावा व 3-4) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ज्युनियर महाराष्ट्र क्रिकेट अकादमी संघाने बी स्पोर्टस संघाचा 56 धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला. अन्य लढतीत आदर्श चोरघडे (3-7) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर स्पेशलाइज क्रिकेट क्लिनिक संघाने रन्स क्रिकेट अकादमी संघावर 10 गडी राखून विजय मिळवला.





