अदानी प्रकरणात यु-टर्न, राष्ट्रवादी भाजपची बी टीम? मनसेचा खोचक सवाल,’भाजप ची बी टीम ?’

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत कॉंग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावरूनही राष्ट्रवादीने राहुल गांधी यांच्यासमोरच दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे पंतप्रधानांच्या डिग्रीचा वाद सुरू असतानाच अजित पवारांनी मात्र पदवीचा मुद्दा महत्त्वाचा नसल्याची प्रतिक्रिया दिली. 2014 साली जनतेने मोदींना त्यांची पदवी पाहून मतदान केले नव्हते, असे अजित पवार म्हणाले होते.
अदानी प्रकरणात राष्ट्रवादीने घेतलेला यु टर्न म्हणजे राष्ट्रवादी भाजप नी लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहे का ?की दुसऱ्यांना भाजप ची बी टीम आहे असे आरोप करणारे स्वतःच बी टीम झाले आहेत ???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 9, 2023
दरम्यान आता यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी भाजपची बी टीम असल्याचे म्हटले आहे. संदीप देशपांडे ट्विट केले आहे की,’अदानी प्रकरणात राष्ट्रवादीने घेतलेला यु टर्न म्हणजे राष्ट्रवादी भाजप नी लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहे का ? की दुसऱ्यांना भाजप ची बी टीम आहे असे आरोप करणारे स्वतःच बी टीम झाले आहेत ???’ असा सवालच देशपांडे यांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे, तेव्हाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाविकास आघाडीमध्ये असतानाही घेतलेल्या या तीन वेगळ्या भूमिकामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धक्कातंत्र पाहायला मिळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात 2019पासून राजकारणात दररोज नवनवीन वळण घेत असल्याचे दिसून येत आहे.





