Ajit Pawar house news : अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर जादूटोण्याच्या प्रकार? रोहित पवारांकडून सखोल चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम आमदार अमोल मिटकरी यांच्या सोशल मीडिया पोस्टने केले.

Ajit Pawar house news – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या कथित जादूटोण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी काही महिने आधी त्यांच्या मुंबई आणि पुणे येथील निवासस्थानांबाहेर अघोरी विधी करण्यात आल्याचा खळबळजनक दावा आता समोर आला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, रोहित पवार यांनी फेसबुक आणि ‘एक्स’च्या माध्यमातून सरकारकडे दाद मागितली आहे. पुण्याच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थान आणि मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या एका ज्योतिष्याने हे विधी केल्याचे बोलले जात आहे. Ajit Pawar house news
महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे आणि अशा राज्यात अंधश्रद्धेला किंवा अघोरी प्रवृत्तींना स्थान असता कामा नये, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या प्रकरणामागे नेमका कोणाचा हात आहे आणि हे विधी करण्यासाठी कोणी आदेश दिले होते, याचा शोध घेण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.
अमोल मिटकरींचा दावा : Ajit Pawar house news
या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम आमदार अमोल मिटकरी यांच्या सोशल मीडिया पोस्टने केले. मिटकरी यांच्या दाव्यानुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये पुणे जिल्ह्यात काही संशयास्पद विधी करण्यात आले होते. या विधींचा संबंध शिवलिका आश्रम चालवणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोककुमार खरात याच्याशी जोडला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, खरात याला नुकतेच एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नाशिकमधून अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबतही मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अजित पवार यांचा पुण्याला जाण्याचा प्रवास रस्तेमार्गे ठरेलला असताना, अचानक त्यांनी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला, असा सवाल त्यांनी विचारला आहे. ज्या ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाने त्यांनी प्रवास केला, त्या कंपनीशी या भोंदू बाबाचे काय संबंध होते, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.





