Pune District : खेड तालुक्यात दुरंगी, तिरंगी लढती; जिल्हा परिषदेत 18, पंचायत समितीत 37 उमेदवारांनी घेतली माघार
Pune District : माघारीनंतर आता खेड तालुक्यातील सर्व गट व गणांमधील निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून विविध पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज (दि. 27) शेवटचा दिवस होता. या दिवशी जिल्हा परिषदेच्या आठ गटांतून 18 उमेदवारांनी तर पंचायत समितीच्या 16 गणांतून तब्बल 37 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली.
माघारीनंतर आता खेड तालुक्यातील सर्व गट व गणांमधील निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले असून विविध पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. वाफगाव-रेटवडी गटातील भाजपच्या उमेदवार श्रद्धा सांडभोर, अनुजा नितीन जाधव, मेदनकरवाडी गटातील जनता दल (सेक्युलर) चे मछिंद्र उमाप तसेच नाणेकरवाडी-म्हाळुंगे गटातील भाजपचे संदीप सोमवंशी व क्रांती सोमवंशी यांच्यासह 13 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.
पंचायत समितीच्या गणांमध्येही मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्या असून रेटवडी गणातून भाजपचे गणेश गुंडाळ, म्हाळुंगे गणातून क्रांती सोमवंशी, आळंदी ग्रामीण गणातून अमोल वीरकर, आंबेठाण गणातून शिवसेनेच्या निर्मला मांडेकर यांच्यासह एकूण 37 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
जिल्हा परिषद – गटनिहाय उमेदवार
वाडा-वाशेरे : विठ्ठल वनघरे (शिवसेना उबाठा – मशाल), डॉ. संतोष सुपे (शिवसेना – धनुष्यबाण), समीर सुपे (राष्ट्रवादी – घड्याळ), सुधीर भोमाळे (अपक्ष – कपबशी).
कडूस-चास : तनुजा घनवट (शिवसेना उबाठा – मशाल), वसुधा अंकुश राक्षे (राष्ट्रवादी – घड्याळ)
वाफगाव-रेटवडी : रोहिणी थिगळे (शिवसेना – धनुष्यबाण), अश्विनी पाचारणे (राष्ट्रवादी – घड्याळ), दीप्ती भोगाडे (शिवसेना उबाठा – मशाल), रुपाली जाधव (अपक्ष – सूर्यफूल)
पिंपळगाव तर्फे खेड-मरकळ : विष्णुदास थिटे (भाजप – कमळ), शरद मोहिते (राष्ट्रवादी – घड्याळ), श्रीनाथ लांडे (शिवसेना – धनुष्यबाण), विजयसिंह शिंदे (शिवसेना उबाठा – मशाल), चंद्रकांत भोर (अपक्ष – बॅट), भूदेव शिंदे (अपक्ष – हेलिकॉप्टर)
खेड पंचायत समिती – गणनिहाय उमेदवार
वाडा – ज्योती शंकर मोरमारे- डामसे (राष्ट्रवादी काँग्रेस), आशा संतोष सुपे (शिवसेना उबाठा), मनीषा गणेश हिले (शिवसेना). वाशेरे – विकास बबन भारती (शिवसेना उबाठा), रोहिदास दत्तात्रय मेठल (शिवसेना). दिनेश चिंतामण हांडे (राष्ट्रवादी काँग्रेस). कडूस – शंकर रघुनाथ कावडे (राष्ट्रवादी काँग्रेस), चांगदेव ज्ञानेश्वर ढमाले (शिवसेना), संतोष नामदेव ढमाले (शिवसेना उबाठा), कैलास सुदाम मुसळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), प्रमोद अनिल शिंदे (भाजप), चंद्रकांत देवराम भोर (अपक्ष), शिवकुमार दामोदर सुकाळे (अपक्ष). चास – प्रियांका अभिजित देवदरे (राष्ट्रवादी काँग्रेस), कविता वैभव राक्षे (शिवसेना उबाठा), शशिकला वैभव शिंदे (अपक्ष). वाफगाव – संतोष संभाजी गार्डी (भाजप), अजय देवराम चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे (शिवसेना उबाठा) सुनीता संतोष सांडभोर (शिवसेना), वैभव दगडू गावडे (अपक्ष). रेटवडी – अशोक निवृत्ती चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस), दिलीप राजाराम डुबे (शिवसेना उबाठा), अनिता विलास मांजरे (शिवसेना). पिंपळगाव तर्फे खेड – चैताली विष्णुदास थिटे (भाजप), सीमा संतोष दौंडकर (शिवसेना), रोहिणी धैर्यशील पानसरे (राष्ट्रवादी काँग्रेस), विद्या सयाजी मोहिते (शिवसेना उबाठा), मरकळ – प्रसाद अशोक घेनंद (शिवसेना उबाठा), विशाल प्रकाश झरेकर (शिवसेना), भगवान महादू लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस), भूदेव कान्हू शिंदे (अपक्ष). मेदनकरवाडी- अरुण पोपट कुसाळकर (शिवसेना उबाठा), महेंद्र अशोक मेदनकर (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय सीताराम वाघमारे (शिवसेना). काळुस – सय्यद गुलाब इनामदार (राष्ट्रवादी काँग्रेस), नवनाथ भुजंग कड (शिवसेना), मंगेश गुलाब सावंत (शिवसेना उबाठा), दत्तात्रय नारायण जरे (अपक्ष). पाईट – सारिका अर्जुन गोगावले (शिवसेना उबाठा), पल्लवी जयसिंग दरेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), जया रणजित भोकसे (शिवसेना), कावेरी वैभव राळे (भाजप). आंबेठाण – रोहिणी सचिन पडवळ (शिवसेना उबाठा), श्रद्धा दत्तात्रय मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), योगिता बाळासाहेब लिंभोरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार). म्हाळुंगे- अर्चना नितीन गाडे (शिवसेना), अश्विनी सोमनाथ तरस (राष्ट्रवादी काँग्रेस), दीपाली अमित बवले (शिवसेना उबाठा). नाणेकरवाडी – रुपाली दीपक कांबळे (शिवसेना उबाठा), छाया किरण किर्ते (शिवसेना), सविता दत्तात्रय गोतारणे (काँग्रेस), रत्नकला सुरेश जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रियांका अमोल पाटोळे (भाजप), कविता नवनाथ म्हस्के (अपक्ष), नंदा पांडुरंग शिंदे (अपक्ष). कुरुळी – सुरेखा राहुल गवारी (राष्ट्रवादी काँग्रेस), तनुजा निलेश पवार (शिवसेना), गौरी चंदन मुर्हे (शिवसेना उबाठा). आळंदी ग्रामीण- काळुराम ज्ञानोबा थोरवे (शिवसेना उबाठा), निखिल गोपाळ थोरवे (राष्ट्रवादी काँग्रेस).
हेही वाचा : Pune District : हवेली तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर





