Ladki Bahin Yojana : दोन हजार महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना.! नेमकं काय घडलं? एकदा पाहाच…
राज्यातील सुमारे 92 लाख लाडक्या बहिणींना विविध कारणास्तव योजनेचा लाभ मिळणे बंद झाले असून, दुसरीकडे स्वतःहून तब्बल दोन हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला.

Ladki Bahin Yojana – राज्यातील सुमारे 92 लाख लाडक्या बहिणींना विविध कारणास्तव योजनेचा लाभ मिळणे बंद झाले असून, दुसरीकडे जळगावमध्ये स्वतःहून तब्बल दोन हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला आहे.
या महिलांनी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज केला आहे. एकावेळी एकच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार असल्याच्या शासनाच्या धोरणामुळे महिलांनी हा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यातील महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला आहे. राज्य सरकारने सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करून 92 लाख लाडक्या बहिणी कमी केल्या आहेत.
त्यामध्ये, अनेक महिला केवायसी पूर्ण करू शकल्या नसल्याने बाद झाल्या आहेत, काही चारचाकी वाहनांमुळे, काही अडीचल लाखांची मर्यादा असल्याने योजनेतून बाद झाल्या आहेत.






