पाकसोबतच्या तणावात भारताचा मोठा विजय ; दोन दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त

Two terrorists surrender । पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया काही केल्या थांबवत नसल्याचे दिसत आहे. तो नेहमीच सीमेपलीकडून भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी त्याचा आणखी एक कट अयशस्वी झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला भाग पाडले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन भागात सुरू केलेल्या घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान (CASO) लष्कर-ए-तैयबा (LeT) संबंधित दोन हायब्रिड दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विशिष्ट माहितीनंतर, शोपियानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) ने भारतीय लष्कराच्या 44 RR आणि CRPF च्या 178 बटालियनच्या समन्वयाने संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली.
पुढे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “त्यांच्याकडून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये दोन AK-56 रायफल, चार मॅगझिन, 7.62×39 मिमीच्या 102 राउंड, दोन हँडग्रेनेड, दोन पाउच, 5,400 रुपये रोख, एक मोबाईल फोन, एक स्मार्टवॉच, दोन बिस्किट पॅकेट आणि एक आधार कार्ड यांचा समावेश आहे.
अलिकडेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतरही दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला. सुरक्षा दलांनी आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर Two terrorists surrender ।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. तथापि, यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. अखेर पाकिस्तानला युद्धबंदी मान्य करावी लागली. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर, त्याने तुर्कीसह अनेक देशांकडे मदतीसाठी याचना केली.
लष्कराची शोध मोहीम Two terrorists surrender ।
संशयित दहशतवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील उंच भागात शोध मोहीम सुरू केली होती. बानी परिसरातील लोवांग आणि सार्थल या उंचावरील भागातही लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) वेढा घातला होता. किश्तवाडसह इतर ठिकाणीही लष्कराकडून शोध मोहीम राबवण्यात आली.





