क्वालालांपूर विमानतळावर अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी दोन विमाने
Updated On:

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्वालालांपूर विमानतळांवर अडकलेल्या 200 भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने दिल्ली आणि विशांखापट्टनंमसाठी एअर एशियाच्या उड्डानाना मंजूरी दिली आहे.
या 200 जणांमध्ये बहुतांश भारतीय विद्यार्थी असून त्यांना क्वालालांपूर विमानतळावर कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. त्यांनी या 200 भारतीयांना एअर एशिया विमान कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
भारताने तुर्की, ब्रिटनसह, युरोपीयन देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तसेच अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशिया या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनाही भारतात प्रवेश करता येणार नाही.





