समालोचन किंवा आयपीएल संघाचे प्रशिक्षक

नवी दिल्ली – भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची मुदत संपल्यावर रवी शास्त्री यांच्यासमोर दोन पर्याय दिसत आहेत. पुन्हा एकदा समालोचक म्हणून कार्यरत होणे तसेच आयपीएल स्पर्धेतील एखाद्या संघाचे प्रशिक्षक बनणे असे दोन पर्याय शास्त्री यांच्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आयपीएल स्पर्धेतील काही संघांनी त्यांच्याशी संवादही साधल्याचे समोर येत आहे.
अमिराती व ओमानमध्ये सुरू झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर शास्त्रींचा बीसीसीआयशी असलेला करार संपत आहे.
आता भविष्यात आयपीएलमधील एखाद्या संघांचा प्रशिक्षक किंवा समालोचक म्हणून काम करण्याचे ठरवले असल्याचे संकेत खुद्द शास्त्री यांनीच दिले आहेत.
गेल्या 15 वर्षांत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांनी दोन वेळा जबाबदारी पार पाडली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचक म्हणून शास्त्री हे प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र, एखाद्या आयपीएल संघाचे प्रशिक्षकपद मिळाल्यास तीही जबाबदारी शास्त्री पार पाडू शकतात





