Mumbai News : मुंबईत गणेश मंडपाजवळ विजेचा धक्का लागून चिमुरडीसह २ जणांचा दुर्दैवी मृत्यू; ४ जण जखमी
Mumbai News : मुंबईतील काळाचौकी (लालबाग) भागात रविवारी पहाटे गणेशोत्सवाच्या गर्दीदरम्यान अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईतील लालबाग भागात रविवारी महागणपती उत्सव मंडळाच्या मंडपाजवळील पिण्याच्या पाण्याच्या तात्पुरत्या स्टॉलवर विजेचा धक्का लागल्याने आठ वर्षांची मुलगी आणि एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य चौघे जखमी झाले. (Mumbai News)
रागिणी घनश्याम यादव (८) या मुलीला भायखळा येथील रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. किरण अकबर नाईक (१९), तन्वी नरेश हांडे (१९) आणि साहिल संदीप तरे (१९) या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. (Mumbai News)
इतर दोन व्यक्तींना परळ येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे सुजाता (३३) या महिलेला मृत घोषित करण्यात आले. रुही सिंग ( १२) या अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर असून तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai News)
ही घटना पहाटे २.२० च्या सुमारास काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील दिग्विजय मिल चाळमधील महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. गणेशोत्सवामुळे या परिसरात त्यावेळी मोठी गर्दी होती. (Mumbai News)
मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि शीतपेयाच्या तात्पुरत्या स्टॉलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याचे आढळून आले. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळाचा वीजपुरवठा खंडित केला आणि खबरदारीचा उपाय म्हणून तो परिसर सील केला. शॉर्ट सर्किटचे नेमके कारण शोधण्यासाठी कालाचौकी पोलिसांनी या घटनेचा सविस्तर तपास सुरू केला आहे. (Mumbai News)
Mumbai News : मुंबईत दहीहंडी उत्सवात ३७६ गोविंदा जखमी; ५३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू





