Mumbai News : मुंबईत दहीहंडी उत्सवात ३७६ गोविंदा जखमी; ५३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai News : शनिवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवा दरम्यान मुंबईत मानवी मनोरे रचताना एकूण ३७६ गोविंदा जखमी झाले आहेत.

Mumbai News : मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान ३७६ गोविंदा जखमी झाले आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा एक भाग असलेला दहीहंडी उत्सव शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. या परंपरेनुसार, दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा किंवा सहभागी मंडळी मानवी मनोरे रचतात. (Mumbai News)
या उत्सवादरम्यान एकूण ३७६ गोविंदा जखमी झाले. सर्वाधिक जखमींची नोंद दक्षिण मुंबई भागातील रुग्णालयांमध्ये (१८३) झाली; त्यानंतर पश्चिम उपनगरांमध्ये १२६ आणि पूर्व उपनगरांमध्ये ६२ जण जखमी झाल्याची नोंद झाली. (Mumbai News)
जखमींपैकी ५३ जण सध्या रुग्णालयात दाखल आहेत, ३७ जण उपचार घेत आहेत, तर २८६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. परळ येथील केईएम रुग्णालयात सर्वाधिक ७६ जखमी गोविंदांवर उपचार केले. (Mumbai News)
त्यानंतर जोगेश्वरी येथील एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालयात ३४, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय आणि विक्रोळी येथील व्ही. देसाई रुग्णालयात प्रत्येकी ३३, तसेच मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ३२ जखमींवर उपचार झाले. महापालिकेच्या सायन रुग्णालयात आणि गोवंडी येथील बीडीबीए रुग्णालयात प्रत्येकी १८ जखमींची नोंद झाली, असे महापालिकेने सांगितले. (Mumbai News)
Mumbai News : नवी मुंबईत तब्बल ‘इतक्या’ लाखांचे अमली पदार्थ जप्त; ६ जणांना अटक





