Air India flights : एअर इंडियाची दोन विमाने सामानाविनाच उडाली; पाटणा विमानतळावर मोठा गोंधळ

पाटणा : विमानातील गैरसोयी आणि प्रवाशांच्या त्रासाच्या बातम्यांमुळे एअर इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी एअर इंडियाची दोन विमाने प्रवाशांच्या सामानाकडे न पाहताच पाटणा विमानतळावर पोहोचली. त्यानंतर प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला.
यामध्ये शनिवारी बेंगळुरूहून पाटणा येथे पोहोचलेली फ्लाइट आयएक्स 2936 आणि चेन्नईहून आलेली फ्लाइट एक्सआय1634 यांचा समावेश आहे. बेंगळुरूहून येणारे विमान १८० प्रवाशांचे सामान न घेता पाटणा येथे उतरले, तर चेन्नईहून येणाऱ्या अनेक प्रवाशांचे सामानही पाटणा येथे पोहोचले नाही.
जेव्हा प्रवाशांनी गोंधळ घातला तेव्हा एअर इंडियाने सांगितले की, ते जास्त वजनामुळे सामान आणू शकले नाहीत. पाटणा विमानतळाची धावपट्टी लहान आहे आणि येथे पाऊस पडत आहे.
त्यामुळे जड सामान आणता येत नाही. इतकेच नाही तर विमान कंपनीने प्रवाशांना सामानासाठी एक दिवस वाट पाहण्यास सांगितले. विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, आज एअर इंडियाचे कोणतेही विमान पाटण्याला येणार नाही, त्यामुळे प्रवाशांना उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत सामानासाठी वाट पहावी लागेल.





