एअर इंडियाची फ्लाईट रद्द; दिल्लीहून इंदूरला जात होते विमान; नेमकं काय घडलं?

Air India Flight Emergency Landing| रविवारी एअर इंडिया विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे चिन्ह वैमानिकाला दिसल्याने गोंधळ उडाला. इंदूरला जाणारे हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच दिल्लीला परतले. उड्डाणानंतर काही वेळातच उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसले. त्यानंतर विमान दिल्लीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणाबाबत एअर इंडियाने सांगितले की, विमान तपासणीसाठी थांबवण्यात आले आहे आणि प्रवाशांना पर्यायी विमानात पाठवण्यात येत आहे. विमान ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ हवेत राहिल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत उतरले. सकाळी ६:१५ वाजता विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात ९० हून अधिक लोक होते.
बाकी कसलाही तपशील न देता, एअर इंडियाने सांगितले की, ३१ ऑगस्ट रोजी दिल्लीहून इंदूरला जाणारे विमान एआय २९१३, टेकऑफनंतर लगेचच दिल्लीला परतले कारण कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत मिळाले. मानक प्रक्रियेचे पालन करून, कॉकपिट क्रूने इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला आणि विमान दिल्लीला परत आणण्यात आले. तिथे विमान सुरक्षितपणे उतरले.
एअर सेफ्टी रेग्युलेटर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. लँडिंग होताच, विमानातील प्रवाशांना आपत्कालीन गेटमधून बाहेर काढण्यात आले आणि विमानातील तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, एअरलाइन अधिकारी, विमानतळ कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. Air India Flight Emergency Landing|
हेही वाचा:
कूटनीतीचा नवा खेळ की अमेरिकेला इशारा? ; पंतप्रधानांच्या दौऱ्यावर चीनची माध्यमं काय म्हणतायत? वाचा





