इंदापूर तालुका हादरला! वालचंदनगरमध्ये सापडले सुतळी बॉम्ब, पिस्तूल, मॅग्झीन अन् तलवारी…

वालचंदनगर – इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वालचंदनगर येथील चाळीत गुन्हेगाराकडे नऊ सुतळी बॉम्ब, तीन गावठी पिस्तूल मॅक्झिन सहित, तलवारीसह अन्य सापडले आहे. या प्रकरणी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके याला वालचंदनगर पोलीस स्टेशननने ताब्यात घेतली आहे.
वालचंदनगर येथे टीव्हीवर आणि चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत एनपीडीएमधील आरोपीला पकडण्यात यश आले. कळंब येथील सुरेश उर्फ तात्या सोमनाथ घोडके (वय 23) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
वालचंदनगर पोलिसांनी एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्टन आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा अथवा अन्य हेतूसाठी सराईत गुन्हेगाराला वालचंदनगर पोलीस स्टेशन पुण वेळीच सापळा रचून त्याच्या मुस्क्या आवळल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिली आहे. वालचंदनगर पोलिसांनी ऐन गणपती व ईद-ए-मिलादच्या मुहूर्तावर केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आरोपी सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके (रा. कळंब) याचा वालचंदनगर पोलीस शोध घेत होते. तो वालचंदनगर येथील अंजली बाल मंदीर क्रमांक 1 येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी-3 मधील खोली क्रमांक 3 मध्ये त्याच्या विधी संर्घष ग्रस्त बालक दोन (18 वर्षार्खांलील) मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार वालचंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शैलेक्ष स्वामी, गणेश काटकर, मारुती बनसोडे, चितकोटे, प्रमोद बनसोडे, अमोल चितकोटे, निता किर्दक, चोपणे, अमोल सोनावणे यांच्या पथकाने अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर आरोपीला ताब्यात घेतले.
हा मुद्देमाल ताब्यात –
यात पोलिसांनी त्यांच्याकडून 3 गावठी पिस्टल मॅग्झीन सहीत एक खाली मॅग्झीन, दहा जिवंत काडतुसे (राऊंड), चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दोन लोखंडी कटर, एक लोखंडी तलवार, दोन लोखंडी चाकू, एक मूठ नसलेले तलवारीचे पाते आणि नऊ सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
इंदापूर तालुका हादरला! वालचंदनगरमध्ये सापडले सुतळी बॉम्ब, पिस्तूल, मॅग्झीन अन् तलवारी… pic.twitter.com/hbfeFIqwo8
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 9, 2024





