vijay thalapathy : तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसाठी उपलब्ध होणारा पोलीस वाहनांचा ताफा टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांना देऊ करण्यात आला. मात्र, शपथविधी होईपर्यंत सुरक्षेसाठीचा ताफा स्वीकारण्यास विजय यांनी नकार दर्शवला. (vijay thalapathy) विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पोलीस दलाने शिष्टाचाराचा भाग म्हणून विजय यांच्यासाठी वाहन ताफा उपलब्ध केला. मात्र, तूर्तास वाहन ताफा न स्वीकारण्याची भूमिका विजय यांनी घेतली. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आलेली ताफ्यातील वाहने माघारी परतली. (vijay thalapathy) टीव्हीके तातडीने बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करू शकला नाही. त्यामुळे नियोजित मुख्यमंत्री म्हणून विजय यांचा शपथविधी रखडला. तो शपथविधी ७ मे यादिवशी होणार असल्याचे संकेत याआधी मिळाले होते. (vijay thalapathy) त्या सोहळ्याचे स्थळ म्हणून चेन्नईतील नेहरू इनडोअर स्टेडियम निश्चित करण्यात आले आहे. गुरूवारी शपथविधी होईल या आशेने अभिनेते विजय यांचे चाहते आणि टीव्हीकेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्टेडियमच्या परिसरात जमा झाले. (vijay thalapathy) मात्र, त्यांचा मोठाच भ्रमनिरास झाला. विजय यांचा शपथविधी लांबल्याने टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातून काही कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर (लोकभवन) निदर्शने केली. त्यावेळी निदर्शकांनी विजय यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्याची मागणी केली. (vijay thalapathy)