अंकारा : सोशल मीडिया साइट्सबाबत तुर्कीने मोठे पाऊल उचलले आहे. तुर्कीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर बंदी घातली आहे. इंस्टाग्रामवर बंदी का घालण्यात आली आहे, या निर्णयाच्या कारणाबाबत तुर्कीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ही बंदी किती काळ लागू राहील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अल जज़ीराने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कीने या बंदीच्या कारणाबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. अनेक अहवालांचे असे मत आहे की, इस्टांने हमास नेता इस्माईल हनियाच्या हत्येनंतर त्याच्याशी संबंधित लेखनसामग्री आणि शोक संदेश सोशल साइटवरून हटवले. त्यामुळे तुर्कीने इन्स्टाग्रामवर बंदी घातली आहे. अहवालानुसार, 02 ऑगस्ट 2024 रोजीच्या निर्णयाद्वारे कोणत्याही कारणाशिवाय इन्स्टाग्रामवर बंदी घालण्यात आली आहे. याआधी बुधवारी तुर्कीचे कम्युनिकेशन डायरेक्टर फहरेटिन अल्तुन यांनी ‘हमास प्रमुख इस्माईल हनिया यांच्या निधनाबद्दल केलेली शोकसंदेशाची पोस्ट ब्लॉक केल्याचा आरोप इंस्टाग्रामवर केला होता. अल्तुन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करताना म्हटले आहे की, “मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामचा तीव्र निषेध करतो. जे लोकांना कोणतेही कारण न देता हानियाच्या हौतात्म्यावर शोक पोस्ट करण्यापासून थांबवते. सेन्सॉरशिपचा हा अतिशय स्पष्ट प्रयत्न आहे.” Nigeria’s Economic Crisis : नायजेरियात आर्थिक संकटाविरोधात प्रचंड निदर्शने, 13जणांचा मृत्यू… अल्तुन इथेच थांबले नाही ते पुढे म्हणाले की, “आम्ही या सोशल मीडिया साइट्सच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करत राहू. ज्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे की ते शोषण आणि अन्यायाच्या जागतिक व्यवस्थेची सेवा करतात. ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या पॅलेस्टिनी बांधवांच्या पाठीशी प्रत्येक प्रसंगी आणि प्रत्येक व्यासपीठावर उभे राहू. पॅलेस्टाईन लवकरच मुक्त होईल. इस्रायल आणि त्यांचे समर्थक हे थांबवू शकणार नाहीत.” दरम्यान, तुर्कीच्या माहिती तंत्रज्ञान आणि संप्रेषण प्राधिकरणाने (BTK) 2 ऑगस्टचा हा निर्णय त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केला आहे. ही बंदी अनेक प्रश्न निर्माण करते. हा निर्णय फक्त हानियाच्या मृत्यूचे शोक संदेश ब्लॉक केल्यामुळे आहे की आणखी काही कारणे आहेत? दरम्यान, अद्याप तरी तुर्की सरकारने या बंदीचे कोणतेही कारण दिलेले नाही