Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या दीर्घायुष्यासाठी तुळजाभवानीच्या दरबारात महाआरती
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून महाआरती करण्यात आली.

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून महाआरती करण्यात आली. (Manoj Jarange)
तुळजाभवानीचे मानाचे कुंकू, कवड्याची माळ आणि संबळ घेऊन तुळजापूरातील पुजारी तसेच मराठा समाजबांधव अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. अंतरवाली सराटी येथे तुळजाभवानीचा जागरण-गोंधळ घालण्यात येणार आहे. (Manoj Jarange)
मनोज जरांगे पाटील यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला सद्बुद्धी यावी आणि जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी तुळजापूरात जागरण-गोंधळ घालण्यात येणार असल्याची माहिती मराठा बांधवांनी दिली. (Manoj Jarange)





