Anjali Damania : happy birthday! अदानीजी; मिलिंद नार्वेकरांची पोस्ट, दमानिया म्हणाल्या “अरेच्चा ठाकरे तर…”
Anjali Damania : आता पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकरांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Anjali Damania : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. राज्यातील विविध प्रश्नांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून, त्यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.
विधानसभेच्या दोन्ही सभागृहात राज्यातील विविध प्रश्नांवर वातावरण तापल्याचे दिसत आहे. २२ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून आजही दोन्ही सभागृहात जोरदार खंडाजंगी होणार असल्याची चर्चा आहे.
एकीकडे पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठवली जात असताना, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Anjali Damania)
गेल्या काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर यांनी राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांचा फोटो शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं होतं. आता पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकरांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ही पोस्ट रिपोस्ट करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नार्वेकरांच्या पोस्टवरुन सवाल उपस्थित केला आहे.
अरेच्चा!
ठाकरे तर अडाणींच्या नावाने शंख करत असतात ना? आणि नार्वेकर?
काहीच कळेनासं झालंय https://t.co/cHTXS2pJXl
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) June 24, 2026
मिलिंद नार्वेकरांनी काय पोस्ट केली? (Anjali Damania)
ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अदानी समूहाचे सर्वसर्वा गौतम अदानी यांच्याविषयी पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये गौतम अदानी यांचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. Wishing Shri @gautam_adani ji a very happy birthday! असे मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
या पोस्टवर अंजली दमानिया यांनी अरेच्चा! ठाकरे तर अडाणींच्या नावाने शंख करत असतात ना? आणि नार्वेकर? असे सवाल करत काहीच कळेनासं झालंय असं म्हटलं आहे.





