Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा आणखी एक धडाकेबाज निर्णय; सर्वसामान्यांना मोठा दिलासा
Tukaram Mundhe : गुटखा किंग आणि निकृष्ट अन्नपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता औषध क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी गुटखा, निकृष्ट अन्नपदार्थ आणि अन्नसुरक्षेबाबत धडक कारवाया सुरू केल्या आहेत. आता त्यांनी रुग्णालयांमधील औषध विक्रीतील मनमानीवरही कठोर भूमिका घेत सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. (Tukaram Mundhe)
एफडीएने जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार, कोणत्याही रुग्णाला रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Tukaram Mundhe)
प्रिस्क्रिप्शन थेट रुग्णांच्या हातात देणे बंधनकारक (Tukaram Mundhe)
अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन थेट रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमध्ये पाठवले जाते आणि रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना ते दिले जात नाही. या प्रकारावर आक्षेप घेत एफडीएने डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन थेट रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या हातात देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. (Tukaram Mundhe)
नियम मोडल्यास कठोर कारवाई
रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधून औषधे घेण्यास भाग पाडणे, प्रिस्क्रिप्शन न देणे किंवा कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणे आढळल्यास संबंधित रुग्णालय किंवा जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे. (Tukaram Mundhe)
मराठी आणि इंग्रजीतील सूचना फलक अनिवार्य
सर्व रुग्णालयांना त्यांच्या परिसरात मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्ट दिसतील असे सूचना फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या फलकांवर रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याची माहिती नमूद करणे आवश्यक राहणार आहे. (Tukaram Mundhe)
तक्रार कुठे कराल?
जर एखादे रुग्णालय प्रिस्क्रिप्शन देण्यास नकार देत असेल, विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती करत असेल किंवा इतर कोणताही अडथळा निर्माण करत असेल, तर नागरिक एफडीएच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे तक्रार नोंदवू शकतात. अशा तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Tukaram Mundhe)
तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयामुळे रुग्णालये आणि औषध विक्रेत्यांमधील सक्तीच्या व्यवहारांना आळा बसण्याची शक्यता असून, रुग्णांना औषध खरेदीचे स्वातंत्र्य आणि आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे. (Tukaram Mundhe)






