Tukaram Mundhe : अन् एका मिनिटात माझं आयुष्य बदललं; UPSC निकालाच्या दिवसाचा भावूक किस्सा तुकाराम मुंढेंनी सांगितला
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी UPSC निकालाच्या दिवशीचा एक अत्यंत भावूक आणि तितकाच प्रेरणादायी किस्सा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केला आहे.

Tukaram Mundhe : आपल्या कडक शिस्ती, प्रामाणिक कारभार आणि धाडसी निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी यूपीएससीच्या निकालाच्या दिवसातील एक प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी एका मिनिटात आयुष्य आणि समाजाचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो, हे सांगितले. (Tukaram Mundhe)
यूपीएससी परीक्षेच्या निकालाची आठवण सांगताना तुकाराम मुंढे म्हणाले, 11 मे 2005 हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. त्या वेळी मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ग्रुप-बी प्रशिक्षणात होतो. यूपीएससीचा अंतिम निकाल लागला आणि मी देशात 20वा क्रमांक मिळवल्याचे समजले. तो क्षण माझ्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. (Tukaram Mundhe)
निकालाच्या क्षणाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले, दुपारी 3 वाजून 59 मिनिटांपर्यंत माझ्यासोबतचे प्रशिक्षणार्थी आणि वरिष्ठ अधिकारी मला सहजपणे ‘तुकाराम’ म्हणून हाक मारत होते. पण दुपारी 4 वाजता निकाल लागला आणि मी देशात 20वा आलो असल्याचे समजताच, त्याच लोकांनी मला ‘तुकाराम सर’ म्हणून संबोधायला सुरुवात केली. (Tukaram Mundhe)
या अनुभवातून विद्यार्थ्यांना संदेश देताना मुंढे म्हणाले, त्या एका मिनिटाने मला खूप काही शिकवलं. समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका क्षणात बदलू शकतो. पण तो बदल घडवून आणण्याची ताकद तुमच्या मेहनतीत, विचारांमध्ये, आचारात आणि तुम्ही निर्माण केलेल्या कर्तृत्वात असते. (Tukaram Mundhe)
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता सातत्याने मेहनत घ्यावी, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. त्यांच्या या प्रेरणादायी अनुभवाची सध्या सोशल मीडियावर आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चर्चा होत आहे. (Tukaram Mundhe)






