Tukaram Mundhe – प्रशासनाच्या कोणत्याही खात्यात कार्यरत आले तरीही तुकाराम मुंढे यांच्या काम करण्याच्या शैलीची नेहमीच चर्चा सुरु असते. त्यांना कडक शिस्त असलेले डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या तपासात जर एखादा बेजबाबदार अधिकारी आढळला तर त्याच्या होणारी कारवाई ही अटळ असते. तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकणाचे अधिकारी त्यांचा चांगलाच दह्स्क घेत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.
मोठी बातमी! शिर्डी साई संस्थानचा कारभार आता डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबादारी असताना मुंढे यांनी अनेक ठिकाणी आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बेजबाबदार डॉक्टर कर्मचाऱ्यांना चांगलाच धडा शिकवलं होता. मुख्यालयी न राहणाऱ्यांना वेतनकपात व घरभाडे कपातीच्या नोटीसा, २४ तास ड्युटी करा, इंटर्नशिप करणाऱ्यांनीही ड्युटी करावी लागेल, अशी शिस्त मुंढे यांनी लावली होती. त्याचबरोबर कोव्हीड संदर्भातील योजनांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच चौकशी त्यांनी लावली होती.
मोठी बातमी! शिर्डी साई संस्थानचा कारभार आता डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार
आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी संभाळल्यानंतर मुंढे ( Tukaram Mundhe ) यांच्या कार्यशैलीमुळे सुरुवातीपासूनच डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा विरोध असल्याचं दिसत होतं. दरम्यान, डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मुंढे यांची तक्रारी केल्याची माहितीही समोर आली होती. त्यातच आता त्यांची बदलीही होणे चर्चेचा विषय बनला आहे.
तुकाराम मुंढे यांची काम करण्याची पद्धत अनेकवेळा तेथील अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला खटल्याने त्यांची वारंवार बदली झाल्याचे दिसले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मुंढे यांच्याकडे आरोग्य अभियान आयुक्तदपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, रुजू झाल्यानंतर काही काळातच त्यांनी प्रशासनाच्या कामाची कानउघाडणी करायला सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी आरोग्य विभागातील अनेक गैरप्रकारांना बाहेर काढले होते. याच कारणांमुळे तुकाराम मुंढे यांची दोनच महिन्यात बदली करण्यात आल्याची शक्यता आहे.