Kedar Shinde : “तुका” म्हणे चायनीज ऐसेची खावे. रंग नाही हो ! एकदम निरमा इफेक्ट! दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत
Kedar Shinde : या कारवाईमुळे भेसळखोरांच्या मनात तुकाराम मुंढे या नावाची दहशत निर्माण झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Kedar Shinde :सध्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे या डँशिग प्रशासकीय IAS अधिकाऱ्याच्या कारवाईची चर्चा आहे. मे महिन्यात त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी पनीर, दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर रोख लावत धडक कारवाई केली. या कारवाईमुळे भेसळखोरांच्या मनात तुकाराम मुंढे या नावाची दहशत निर्माण झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तुकाराम मुंढेंनी हॅाटेलकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी यासाठी नियमावली देखील जारी केली आहे. त्या नियमांना अधिन राहून हॅाटेल व्यावसायिकांना काम करावे लागणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या हॅाटेलवर कारावाईचा बडगा उगारत थेट परवाना रद्द केला जात आहे.
सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेक जण तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत आहे. बरेच जण आता निर्भीडपणे त्यांच्या तक्रारीही त्यांना टॅग करून सांगत आहेत. अशातच आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले आहे.
इंन्स्टाग्रामवरून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणतात “आज घरी हॉटेलमधून चायनीज मागवलं… एवढाच वाटलं, “तुका” म्हणे चायनीज ऐसेची खावे. रंग नाही हो ! एकदम निरमा इफेक्ट! केदार शिंदे यांनी ही पोस्ट तुकाराम मुंडे यांना टॅग केली आहे. दिग्दर्शकाची ही पोस्ट पाहून त्यावर कमेंट सुद्धा येऊ लागल्या आहेत. अनेकांनी त्यांचे हॉटेलमध्ये अनुभव शेअर केले आहेत.
View this post on Instagram
केवळ केदार शिंदेच नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे कौतुक केले आहे. केदार शिंदे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ते लवकरच ‘गणा धाव रे’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे हॅाटेलमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहेत. तरी देखील अजूनही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे येत असून त्यानुसार कारवाई देखील केली जात आहेत.






