कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ मधून तृप्ती डिमरी बाहेर

Aashiqui 3 | ‘आशिकी’ या चित्रपटाने 1990 साली प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटाचा दुसरा भाग 23 वर्षांनंतर रिलीज झाला. यातील श्रद्धा कपूर-आदित्य रॉय कपूर यांच्या केमिस्ट्रीनेही प्रेक्षकांची मने जिंकली. आता चाहते तिसऱ्या भागाची वाट पाहत होते. ‘आशिकी 3’ या चित्रपटाचे अनुराग बासू दिग्दर्शन करणार आहेत. कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी फायनल झाले. या वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. मात्र आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
‘आशिकी’च्या शीर्षकावरून आधीच वाद सुरू होता. याच कारणामुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याचे मिड डेच्या वृत्तात म्हटले आहे. यानंतर आता तृप्ती डिमरी आता या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याचे म्हंटले जात आहे. सध्या तरी निर्मात्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
परंतु, कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जरी ‘आशिकी 3’ पुढे ढकलला गेला असला तरी, दिग्दर्शक अनुराग बसू एका रोमँटिक चित्रपटाची तयारी करत आहेत. ज्यामध्ये ते कार्तिकला कास्ट करणार आहेत. जानेवारी 2025 किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शूटिंग सुरू होईल. तसेच अभिनेत्रीच्या कास्टिंगबाबत प्रक्रिया सुरू असून निर्माते त्याची लवकरकच घोषणा करण्याची शक्यता आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तृप्ती डिमरीने काला, लैला मजनू, बुलबुल सारखे चित्रपट केले आहेत. ‘ॲनिमल’ या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती बॅड न्यूज, विकी विद्या का वो वाला व्हिडिओ, भूल भुलैया 3 सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. आता ती ‘धडक २’ मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा:
रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मिळणार कॅशलेस उपचार’; नितीन गडकरींची घोषणा





