रूमर्ड बायफ्रेंडसोबत विमानतळावर दिसली तृप्ती डिमरी

Trupti Dimri | बॉलीवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीला ‘अॅनिमल’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या सोशल मिडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती सॅम मर्चेंटसोबत मुंबई विमानतळाबाहेर दिसत आहे.
सॅमने त्याच्या निळ्या पोर्शे कारमध्ये तृप्तीला विमानतळावर सोडलं. यामुळे चाहत्यांमध्ये चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
सेलिब्रिटी पापाराझी विरल भयानी याने तृप्ती डिमरीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या पोर्शे कारमधून विमानतळावर पोहोचताना दिसत आहे. कार थांबल्यानंतर आधी तृप्ती बाहेर येते आणि नंतर तिचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चेंट बाहेर येतो. यावेळी तृप्ती कॅज्युअल लुकमध्ये दिसली. फोटोग्राफर्सना पोज देताना तिने सॅमकडे पाहून निरोप दिल्याचे दृश्यही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. याआधीही तृप्ती आणि सॅम अनेकदा एकत्र दिसले आहेत. Trupti Dimri |
View this post on Instagram
मात्र अद्याप सॅम किंवा तृप्ती यापैकी कोणीही त्यांच्या नात्याला अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही, पण तरीही ते दोघं वारंवार एकत्र स्पॉट होत असतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती सॅमसोबत बाइकवर दिसली होती, तर ऑगस्ट महिन्यात पाली भवनमध्ये दोघे डिनर डेटला गेले होते. Trupti Dimri |
‘अॅनिमल’च्या यशानंतर तिच्याकडे प्रोजेक्ट्सची रांग लागली आहे. नुकतीच ती ‘धडक 2’ मध्ये दिसली. याशिवाय संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटात तिच्या प्रवेशाचीही चर्चा आहे. दरम्यान, आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे.
हेही वाचा:





