Trupti Desai on Nasrapur incident : “न्याय मिळत नसेल तर एन्काऊंटर करा!” नसरापूर घटनेवर तृप्ती देसाईं यांची संतापजनक प्रतिक्रिया
Trupti Desai on Nasrapur incident : आधी कोंबड्या-कुत्र्यांवर अत्याचार, आता चिमुरडीचा खून! साळवडेतील ग्रामस्थांनी सांगितली नराधम भीमराव कांबळेची राक्षसी कृत्ये.

Trupti Desai on Nasrapur incident – नसरापूर येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी असणारी आहे. या घटनेविषयी लवकर पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. लवकर न्याय मिळत नसेल तर त्या नराधमाचा एन्काऊंटर करा, अशी संतप्त प्रतिक्रिया समाजसेविका तृप्ती देसाई यांनी दिली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा नराधमाने खून केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाचे सूर उमटले.
यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी नसरापूरला भेट दिली. रविवारी (दि.3) तृप्ती देसाई यांनी भेट दिली. यावेळी देसाई यांनी संतापजनक भावना व्यक्त केल्या. देसाई म्हणाल्या की, अत्याचार प्रकरणात शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट जरी नेमले असले तरी या कोर्टात पाच ते सहा वर्ष निकाल लागत नाही, अशी काही प्रकरणे आहेत.
फास्ट ट्रॅक कोर्टात दररोज सुनावणी केली तर लवकर निकाल लागून न्याय मिळू शकतो. सरकारने दररोज सुनावणी देण्याचे आदेश द्यावेत. नराधमाला न्यायालयीन प्रक्रियेतून शिक्षा द्यायची असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टात दररोज सुनावणी झाली पाहिजे. एक महिन्यात सुनावणी झाली तर निकाल लागून त्याला फासावर लटकवता येईल.
मनोज जरांगे यांची भेट रद्द
भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेबाबत अनेक राजकीय मंडळींनी शनिवारी भेट दिली असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नसरापूर दौऱ्याचे रविवारी नियोजन केले होते. परंतु सकाळी पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, जोपर्यंत माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत कुणीही आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये. न्याय मिळाल्यानंतर राजकीय मंडळींनी व समाजसेवकांनी भेट द्यावी. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा नसरापूर दौरा रद्द केला आहे.
आरोपींकडून लिंगपिसाट कारनामे
भीमराव कांबळे हा राक्षसी प्रवृत्तीचा नराधम भोर तालुक्यातील नसरापूर गावच्या शेजारील साळवडे गावचा रहिवासी असून पूर्वीपासूनच तो राक्षसी स्वभावाचा असल्याचे त्यांच्या गावातील नागरिकांनी सांगितले. यापूर्वी त्याने साळवडे गावात कोंबडीवर, कुत्रीवर व शेळ्यांवर अत्याचार केले होते. गावातील महिलांकडे तो वाईट नजरेने बघत होता.
यापूर्वी त्याने गावात एका वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला होता. छोट्या बालिकेवरही लैंगिक अत्याचार केला होता. अशी त्याने यापूर्वी दोन कृत्ये केली होती. त्याच्या वाईट कृत्यामुळे गावातील नागरिकांनी त्याला गावातून हाकलून दिले होते.






