Trump threat। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला शेवटचा इशारा दिला आहे. त्यांनी निर्वाणीचा इशारा देत,”हमासने गाझामधील ओलिसांच्या सुटकेच्या कराराला सहमती दर्शवावी” असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी,”इस्रायलने माझ्या अटी मान्य केल्या आहेत, आता हमासनेही मान्य करावे.” असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासला गाझामधील ओलिसांच्या सुटकेचा करार स्वीकारण्यास सांगितले आहे. या संदर्भात बोलताना ट्रम्प यांनी, “प्रत्येकजण ओलिसांना घरी परत आणू इच्छितो. हे युद्ध संपावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे! इस्रायलींनी माझ्या अटी मान्य केल्या आहेत. आता हमासनेही सहमती दर्शविण्याची वेळ आली आहे. जर ते सहमत झाले नाहीत तर त्यांना काय परिणाम भोगावे लागतील,” असा थेट इशारा मी हमासला दिला आहे. हा माझा शेवटचा इशारा आहे, आता नाही! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.”असे ट्रॅम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्पने हमाससमोर कोणती अट ठेवली? Trump threat। एका इंग्रजी वृत्तसंस्थेनुसार, ट्रम्प यांनी शनिवारी हमाससमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. या अंतर्गत, हमासला युद्धबंदीच्या पहिल्या दिवशी उर्वरित ४८ ओलिसांना सोडावे लागेल, तर त्या बदल्यात इस्रायलमध्ये बंदिस्त हजारो पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले जाईल.असे म्हटले गेले आहे. तसेच समोर आलेल्या वृत्तानुसार, “एका इस्रायली अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इस्रायल ट्रम्पच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे.” हमासचे इस्रायलवर गंभीर आरोप Trump threat। हमासला तीन ओलिसांना सोडण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी निर्धारित मुदतीपर्यंत तसे केले नाही. हमासने इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत. त्यात म्हटले आहे की इस्रायल युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत आहे, म्हणूनच ओलिसांना सोडले जात नाही.