इतिहासाचे खरे साक्षीदार गड-किल्ले : रामकृष्ण सातव पाटील

वाघोली (प्रतिनिधी) : भारताच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे खरे साक्षीदार गड-किल्ले असून त्यांचे संवर्धन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव पाटील यांनी केले.
वाघोली तालुका हवेली येथे माउली कटके प्रतिष्ठान,अनिल भाऊ सातव पाटील युवा मंच, समीर भाडळे युवा मित्र मंडळ,जगदंब ग्रुप,तसेच विशाल भाऊ सातव पाटील युवा सेना आयोजित विविध ऐतिहासिक किल्ले स्पर्धेच्या निमित्ताने किल्ल्यांच्या प्रतिकृती भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सातव पाटील बोलत होते.
वाघोली येथे डोमखेल रोड येथील हनुमंत कड व राजेंद्र घुले यांच्या कुटुंबियातील लहान मुलांनी मुरुड जंजिरा या किल्ल्याची अप्रतिम अशी भव्य प्रतिकृती साकारली आहे.अभिषेक कड, ऋषिकेश कड, कार्तिकी कड, अंकिता कड, आदित्य घुले, सोहम सातव, ओम घुले, किरण कड, निकिता काळोखे या बालचमूंनी डोमखेल रोड नामदेव कॉम्प्लेक्स येथे मुरुड जंजिरा किल्ल्याची भव्य प्रतिकृती बनवली आहे.
या प्रतिकृतीची पाहणी माजी उपसरपंच हिरामण हरगुडे, दीपक गावडे,नटराज सातव पाटील, संदिप सातव पाटील, अनिल सातव पाटील, राहुल सातव पाटील, अविनाश सातव पाटील, बाळासाहेब सातव, निखिल सातव पाटील, केतन जाधव, संदीप वारे, युवराज गायकवाड, प्रवीण खांदवे, गौरव सातव पाटील, अक्षय सातव पाटील, निखिल सातव पाटील, मिनार जगताप, गणेश सातव आदी मान्यवरांनी केली.





