TRP Scam | Republic media नेटवर्कचे सीईओ विकास खानचंदानी यांना जामीन
कथित टीआरपी घोटाळ्या प्रकरणी ( TRP Scam ) रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे ( Republic Media Network ) सीईओ विकास खानचंदानी ( CEO Vikas Khanchandani ) यांना अखेर आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई – कथित टीआरपी घोटाळ्या प्रकरणी ( TRP Scam ) रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे ( Republic Media Network ) सीईओ विकास खानचंदानी ( CEO Vikas Khanchandani ) यांना अखेर आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागाने रविवारी खानचंदानी यांना त्यांच्या घरातून अटक केली होती.
मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या एका न्यायालयाने खानचंदानी यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिल्याची माहिती खानचंदानी यांचे वकिल नितीन प्रधान यांनी दिली आहे.
टेलीव्हिजन रेटींग एजन्सी “ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंन्सिल’ अर्थात बीएआरसीकडून हंसा रिसर्च एजन्सीच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या कथित टीआरपी घोटाळ्याची ( TRP Scam ) चौकशी सुरु केली आहे.
हंसाच्या एका अधिकाऱ्याने लोकांच्या घरी जात त्यांना पैसे देऊन फक्त ठराविक चॅनेल लावून ठेवण्यास सांगितले होते. त्यात बॉक्स सिनेमा, फक्त मराठी, महा मुव्ही आणि रिपब्लिक टीव्हीचा समावेश होता. या प्रकरणी ( TRP Scam ) पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे.





