Jalgaon News : जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांचा जनआक्रोश; थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन निष्पाप विद्यार्थिनींचा बळी घेतल्यानंतर आदिवासी (Jalgaon News) समाजातील खदखदणारा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे.

Jalgaon News : गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन निष्पाप विद्यार्थिनींचा बळी घेतल्यानंतर आदिवासी (Jalgaon News) समाजातील खदखदणारा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे. या घटनेच्या तीव्र पडसादातून ३१ ऑगस्ट रोजी जळगाव शहर हादरवून सोडणारा भव्य ‘आदिवासी विद्यार्थी जनआक्रोश मोर्चा’ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
आश्रमशाळांमधील निष्काळजी कारभार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आणि वसतिगृहांची दुरवस्था याविरोधात विद्यार्थी आणि समाजबांधवांनी प्रशासनाला थेट जाब विचारत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
मोर्चेकऱ्यांनी केवळ या दुर्दैवी घटनेचा निषेधच केला नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेचे वाभाडे काढत आदिवासी विकास विभागाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. मृत विद्यार्थिनींच्या वारसांना (Jalgaon News) प्रत्येकी १ कोटी रुपये, जखमींना ५० लाख रुपयांची तातडीची मदत, दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन आणि निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करण्याची आक्रमक मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
याशिवाय प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याला १ कोटींचे विमा कवच लागू करावे, स्वाधार योजनेचा भत्ता वाढवून ७५ हजार रुपये करावा, रखडलेली १२ हजार ५०० पेसा पदांची भरती तातडीने पूर्ण करावी आणि जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा गतीने करावा या मागण्यांवर आंदोलक ठाम राहिले. वसतिगृहांमध्ये आधुनिक सुविधा, संगणक आणि वाय-फायसह दर्जेदार अभ्यास साहित्य देण्याची मागणीही करण्यात आली.
या संतापजनक परिस्थितीत आदिवासी विकास मंत्र्यांच्या (Jalgaon News) राजीनाम्याची थेट मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मागण्यांवर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.






