Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का.! तब्बल ‘इतक्या’ हजार बहीणींची ओवाळणी हुकली
सरकारकडून पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर मोठी छाटणी करण्यात आली आहे. सुरुवातीला सुमारे २ कोटी ४८ लाखांपर्यंत असलेली लाभार्थी संख्या आता सुमारे १ कोटी ६५ ते १ कोटी ७० लाखांपर्यंत आली आहे. त्यामुळे तब्बल ९२ लाखांहून अधिक नोंदी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या छानणीत ई-केवायसी पूर्ण न करणे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे, आयकर भरणे, सरकारी नोकरी, चारचाकी वाहनासंबंधी निकष तसेच इतर योजनांमधून मिळणारा लाभ यांसारख्या बाबी तपासण्यात आल्या. मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, ई-केवायसी न करणाऱ्या महिलांची संख्या या कपातीतील मोठा घटक आहे.
दरम्यान, योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. मात्र, जुलैच्या हप्त्याबाबत काही महिलांना रक्कम न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः वयोमर्यादा आणि इतर पात्रता निकषांमुळे काही महिलांचा लाभ थांबू शकतो.
सरकारकडून पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमचे ई-केवायसी पूर्ण आहे का आणि तुमचे नाव पात्र लाभार्थी यादीत आहे का, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अपात्र ठरलेल्या महिलांच्या तक्रारी आणि चुकीने वगळलेल्या नोंदींची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्टपासून जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले. गुरुवार संध्याकाळ पर्यंत एक कोटी ४१ लाख लाडक्या बहीणींना सरकारने दोन हजार ९५ कोटी रुपये ‘ओवाळणी’दिली.






