‘सर्व सजीव सृष्टीला आनंदी ठेवण्याचे काम वृक्षच करतात’ – अंकिता शहा

– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर – मानवी जीवन असो किंवा कोणतीही सजीव सृष्टी असो या सर्वांना आयुष्यभर, आनंदी ठेवण्याचे कार्य वृक्ष करतात असे गौरवोद्गार इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी काढले.
इंदापूर शहरातील वृक्ष संजिवनी परिवाराच्या वतिने इद उल अजहा निमित्त मुस्लीम दफन भुमी येथे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत,वृक्षारोपन करून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
येथील कबरीवर फूले वाहून आदरांजली वाहुन वृक्षारोपण करणेत आले. पुढे माहितीमाजी नगराध्यक्ष अंकिता शहा म्हणाले की, इंदापूर शहरातील प्रत्येक नागरिक वृक्षांवर प्रेम करणार आहे.
त्यामुळे शहरात वनराई निर्माण झाले आहे.प्रत्येकच्या सुख दुःखात वृक्षारोपण करणे नितांत गरजेचे आहे.असेही आवाहन अंकिता शहा यांनी केले.
यावेळी वृक्ष संजिवनी परिवाराचे सायरा आतार, जयश्री खबाले, माधुरी मंदरे, निलोफर पठाण, प्रशांत सिताप, चंद्रकांत देवकर, हमीद आतार, ज्ञानदेव डोंगरे, हाजी सलिमभाई बागवान, अरिफ जमादार यांच्यासह इंदापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





