सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बस उलटली; ३० प्रवासी जखमी

Solapur-Pune Highway Accident | सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्सशिरपूर लातूर येथून पुण्याकडे निघाली होती. त्यादरम्यान टेंभुर्णी जवळ आढेगाव शिवारात प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स पलटी झाली.
पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्याने ट्रॅव्हल्स खड्ड्यात उलटली. ज्यात 30 प्रवासी जखमी झाले असून यातील 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील शिरपूरहून MH 48 के 1918 क्रमांकाची बस पुण्याला निघाली होती. बुधवारी रात्री उशिरा ही बस पुण्याकडे रवाना झाली. पहाटेच्या 4 वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगावच्या शिवारात बस अचानक पलटी झाली.
बस खड्ड्यात पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. सध्या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. Solapur-Pune Highway Accident |
हेही वाचा :





