पुणे जिल्हा | जुन्नच्या उपवनसंरक्षकांची 5 जून रोजी बदली

बेल्हे, (वार्ताहर) – जुन्नर, शिरूर, खेड, आंबेगाव आदी तालुक्यांत बिबट्यांचे वाढते हल्ले या संदर्भातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) संवेदनशील प्रश्नामुळे काही ठिकाणी शेतकरी आणि अधिकारी यांच्यात वाद झाला आणि यातून शेतकर्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करून मागे घेण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. तसेच उपवनसंरक्षक अधिकारी अमोल सातपुते यांची बुधवारी (दि. 5 जून) बदली होणार आहे.
बिबट विषयांवरील विविध मागण्यांसाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे हे शुक्रवार (दि. 24) सकाळी 10 वाजल्यापासून आळेफाटा येथील चौकात बेमुदत आमरण उपोषणास बसले होते. मंगळवारी (दि. 28) सायंकाळी आठच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मुत्यूमुखी पडलेल्या कुटुबीयांच्या हस्ते व प्रसन्न डोके यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन त्यांनी उपोषण सोडले. याप्रसंगी वल्लभ शेळके, माऊली शेळके,प्रदिप देवकर, कैलास वाळुंज,
संतोष घोटने, निलेश शिंदे, अनंतराव गटकळ, दिगंबर घोडेकर, अक्षय कुठे, गणेश गुंजाळ, सचिन वाळुंज, अनिल रायकर, लहू रायकर, मयूर पवार आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. बिबट्याचे वाढते हल्ल्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंगळवारी तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची अजित पवार यांनी मुंबई बैठक घेण्यात आली. ही बैठक पार पडल्यानंतर आळेफाटा या ठिकाणी उपोषण सोडल्यानंतर सोनवणे यांनी पत्रकारांना वरील माहिती दिली.
शरद सोनवणे म्हणाले की, बिबट्यांचे वाढते हल्ले या संदर्भातील विविध प्रश्नांवर मंत्रालयात सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामध्ये सरकारने तातडीने काही उपाययोजना राबविण्यासाठी पावले उचलली आहेत.
जुन्नर तालुका आणि परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता दिसतील ते बिबटे सरसकट पकडून इतरत्र हलविण्याबरोबर इतरही अन्य उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत जुन्नर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्याच्या प्रश्नासंदर्भात महायुती सरकार संवेदनशील आहे व यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सहकार्य लाभले.- शरद सोनवणे





