पुणे जिल्हा | शिवनेरीच्या पायथ्याशी मानवी तिरंगा उभारणार

जुन्नर, (वार्ताहर) – भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गुरुवारी (दि. 15) शिवजन्मभूमी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरमधील बुट्टे पाटील विद्यालय प्रांगणामध्ये सकाळी 10 वाजता मानवी तिरंगा उभा केला जाणार आहे.
जुन्नर मध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
तिरंगा भारताची आन बान शान असून मानवी तिरंगा या उपक्रमातून मातृभूमीचा सन्मान केला जाणार असल्याचे या उपक्रमाचे आयोजक शरद सोनवणे यांनी स्पष्ट करीत शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या बुट्टे पाटील विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी सकाळी 10 वाजता या विद्यालयातील सुमारे 2300 मुला-मुलींच्या सहभागातून हा मानवी तिरंगा उपक्रम संपन्न होणार आहे.
तालुक्यामध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनी हा आगळावेगळा उपक्रम संपन्न होणार असून तालुक्यातील देश भक्तीपर नागरिकांनी हा उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.





