प्रियंका चोप्राच्या ‘हेड ऑफ स्टेट’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Heads Of State Trailer | अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या ‘हेड ऑफ स्टेट’ या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रियंकाने जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
2 मिनिटे 46 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये प्रियंकाचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला असून चाहत्यांच्या देखील तो पसंतीस पडला आहे. यात ब्रिटनचे पंतप्रधान सॅम क्लार्क (इद्रिस एल्बा) आणि अमेरिकेचे अध्यक्ष विल डेरिंगर (जॉन सीना) हे एका संकटात सापडतात, त्यानंतर प्रियंकाची एन्ट्री होती.
View this post on Instagram
अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या चित्रपटासाठी प्रियांकाने खूप मेहनत घेतली आहे. शुटींगदरम्यान जखमी झाल्याचं फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.
अधिकृत माहितीनुसार, ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा एक अॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. ‘‘हेड्स ऑफ स्टेट’ 2 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम होईल. मात्र ट्रेलर पाहून चाहत्यांची चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हेही वाचा:
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी चौकशीचा फास आणखी घट्ट; मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी





