‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित ‘फत्तेशिकस्त’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीच्या कथा नेहमी इतिहासात पाहायला मिळतात. आता ‘फतेशिकस्त’च्या निमित्ताने शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची युद्धनिती पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही या युद्धनितीची दमदार झलक पाहायला मिळतेय.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात विविध कलाकारांची फौज पहायला मिळतेय. अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारखी स्टारकास्टही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

पुरे झालं बुद्धिबळ … आता रक्ताची रंगपंचमी … थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा …. #फत्तेशिकस्त १५ नोव्हेंबरला #Fatteshikast #15Nov AA Films In Association with Almonds Creations presents Written and Directed By : @lanjekar.digpal Produced By : @almondscreations @chinmay_d_mandlekar @mrinalmrinal2 @anupsoni3 @sameerdharmadhikari @ankittmohan @nikhil_n_raut @purkarajay_ @mrunmayeedeshpande @harishh_dd @limayeprasadk @vikram_gaikwad46 @ruchisavarn #TruptiToradmal @siddheshwar.zadbuke #RameshPardeshi @amolhinge_ #NakshatraMedhekar #Astaadkale @rishi_saxena_official #SayliJoshiJadhav #SachinGavali @ganesh_tidke @rajesh.aher @aditibhaskar #AkshayShinde @ashwini_kulkarni_officia #AditiBhatade @Reshmi Sarkar @the_darkest_indigo #PramodKahar @utkarshjadhav @purrnimaoak @sanika_gadgil @nikhilslanjekar @mediaone_pr @rajshrimarathi @dedhiabrijesh @vizualjunkies

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar) on

या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा मराठीत पदार्पण करणार आहे. दरम्यान, १६ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.