‘फास्ट अँड फ्युरियस’चा श्वास रोखून धरणारा जबरदस्त ट्रेलर एकदा पाहाच!
Updated On:

मुंबई – स्पीड, अॅक्शन, शानदार गाड्या आणि जबरदस्त स्टारकास्टमुळे ‘फास्ट अँड फ्युरियस’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे. या चित्रपटाचे पहिले आठ भाग बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. दरम्यान, नुकतंच ‘फास्ट अँड फ्युरियस’च्या पुढील नवव्या भागाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
जवळपास 4 मिनिटांचा हा ट्रेलर असून, यामध्ये WWE स्टार ‘जॉन सिना’ची धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत नंबर 1 ट्रेंड झाला आहे.
‘फास्ट अँड फ्युरियस’ चित्रपट 22 मे म्हणजेच ईदच्या दिवशी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.





