Accident news : लग्नाला जाताना काळाचा घाला.! टेंपो कालव्यात पडून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
मंगळवारी या कालव्यातून १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर बुधवारी आणखी ३ मृतदेह बाहेर काढले गेले. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १५ झाली आहे.

Accident news : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक रिक्षा टेंपो कालव्यामध्ये पडून झालेल्या दुर्घटनेत किमान १५ जण ठार झाले आहेत. या रिक्षा टेंपोमधून २६ जण एका लग्नाला जात होते.
मंगळवारी लाहोरपासून ३५० किलोमीटर अंतरावर मुजफ्फरगड जिल्ह्यातील कोट अड्डू येथे भरधाव वेग नियंत्रणात न राहिल्यामुळे हा रिक्षा टेंपो एका कालव्यामध्ये पडला, असे पंजाब प्रांताच्या आपत्कालिन बचाव पथकाने सांगितले.
टेंपोमधील तिघे पोहत किनाऱ्यावर आल्यानंतर बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने ८ जणांना वाचवले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
मंगळवारी या कालव्यातून १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर बुधवारी आणखी ३ मृतदेह बाहेर काढले गेले. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १५ झाली आहे.